अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- आज एअर इंडिया कंपनी टाटा समुहाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. टाटा समुहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतल्यानंतर आज पुन्हा टाटा समुहाकडेच सोपवली जात आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सरकारने गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला १८,००० कोटी रुपयांच्या मोबदल्यात एअर इंडियाच्या विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, “सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाला गुरुवारी सोपविण्यात येणार आहे.एअर इंडियासोबतच, तिची परवडणारी एअरलाइन एअर इंडिया एक्स्प्रेसचीही हिस्सेदारी विकली जाणार आहे.
याचसोबत त्यांची देखभाल कंपनी एआयएसएटीएसची ५० टक्के हिस्सेदारी टाटा समूहाला दिली जाणार आहे. याबाबतची हस्तांतरणाची औपचारिकता डिसेंबरअखेर पूर्ण होईल असे सरकारकडून सांगण्यात आले होते.
मात्र, त्यास एक महिना विलंब झाला. पुढील काही दिवसांत या कराराची उर्वरित औपचारिकता पूर्ण होण्याची अपेक्षा असून, आज अखेरीस विमान कंपनी टाटा समूहाकडे सोपविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारने २५ ऑक्टोबरला १८ हजार कोटी रुपयांमध्ये एअर इंडियाची विक्री टाटा सन्सकडे देण्यासाठी खरेदी व्यवहार केला. या व्यवहारामध्ये २,७०० कोटी रुपये रोखीत आणि एअर इंडियावरील कर्जदायित्वापैकी १५,३०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम