Indian Railways : भारतीय रेल्वेला प्रवासाचे सर्वात स्वस्त साधन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियमावली जारी केली आहे.
रेल्वेच्या या नियमांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असून अनेकांना हे नियम माहीत नसतात. परंतु, हे नियम तुम्ही जाणून घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रात्री प्रवास करत असताना कोणत्याही प्रवाशाला मोठ्याने बोलण्यास मनाई आहे. तसेच रात्री मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यास मनाई आहे.
रात्री मोठ्या आवाजात बोलले तर इतर प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे संबंधित प्रवाशाने तक्रार केली तर कारवाई होऊ शकते.
रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना रेल्वेमधील सर्व दिवे बंद ठेवावे. टीटीई, आरपीएफ कर्मचारी, खानपान कर्मचारी, इलेक्ट्रिशियन आणि देखभाल कर्मचार्यांना रात्री शांततेने काम करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या कर्मचाऱ्यांना 60 वर्षांवरील वृद्ध, अपंग आणि अविवाहित महिलांना मदत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर तुम्हीही रात्री प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांची जाणीव असावी.