Bank FD : अनेकजण सरकारी आणि खासगी योजनेत गुंतवणूक करत असतात. प्रत्येक योजनांमध्ये वेगवेगळे व्याज मिळते. ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार गुंतवणूक करू शकतात. ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. काही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 8.5 व्याज देत आहेत. तुम्ही अजूनही गुंतवणूक केली नसेल तर लगेच करून घ्या. पहा संपूर्ण लिस्ट.
या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज
डीसीबी बँक
खाजगी क्षेत्रातील DCB बँकेकडून, आपल्या ज्येष्ठ नागरिकांना 25 महिन्यांहुन अधिक आणि 37 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8.35 टक्के दराने व्याज दिले जात आहे. ही बँक ३७ महिन्यांच्या एफडीवर ८.५ टक्के व्याज देत असून कोणत्याही कालावधीच्या FD वर बँकेने देऊ केलेल्या व्याजदरांपैकी हा एक आहे, हे लक्षात घ्या.
बंधन बँक
तसेच बंधन बँक 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देण्यात येत आहे. त्याशिवाय बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांना ५०० दिवसांच्या एफडीवर ८.३५ टक्के व्याज दिले जात आहे.
इंडसइंड बँक
तसेच इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांना ३३ महिने आणि ३९ महिन्यांच्या एफडीवर ८ टक्के व्याज दिले जात असून तर त्याच वेळी, 19 महिने आणि 24 महिन्यांच्या FD वर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे.
IDFC फर्स्ट बँक
IDFC फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांना 751 दिवस ते 1095 दिवसांच्या FD वर 7.75 टक्के व्याज देण्यात येत आहे.
येस बँक
येस बँक ज्येष्ठ नागरिकांना 36 महिने ते 60 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8 टक्के व्याज दिले जात आहे. तर त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना 18 महिने ते 24 महिन्यांहुन कमी कालावधीच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज देण्यात येत आहे.
मिळेल 50,000 रुपयांपर्यंत सूट
हे लक्षात घ्या की आयकर रिटर्नमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५०,००० रुपयांपर्यंतच्या बँक एफडीवर मिळत असणाऱ्या व्याजावर सवलत देण्यात येत आहे. यानंतर 10 टक्के TDC कापला जातो.