Valentine Day 2023 : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाल्यापासून अनेकजण व्हॅलेंटाईन डे ची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण आज व्हॅलेंटाईन डे आहे. देशात सर्वत्र हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.
तसेच या दिवशी प्रत्येकाने सावध राहणे खूप गरजेचे आहे. कारण आजच्या दिवशी प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. जर तुमची फसवणूक झाली तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात सविस्तर.

सायबर फसवणूक करणारे लोकांच्या मोबाईलवर अशा खास प्रसंगी मोहक मेसेज पाठवतात. यात कोणतीतरी मोबाईल जिंकल्याची किंवा कुठलीतरी मोठी गोष्ट जिंकल्याचा मेसेज असतो.
इतकेच नाही तर आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला हे गिफ्ट देऊ शकता, असेही मेसेजमध्ये लिहिले असते. अनेकजण त्यांच्या जाळ्यात येऊन अशा संदेशांवर विश्वास ठेवून पार्टनरला भेटवस्तू देतात. परंतु, त्यांची गोपनीय माहिती संबंधित व्यक्तीला देतात.
ही माहिती त्यांच्याकडून शेअर होताच त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. ताज हॉटेलचे नाव घेऊन फसवणूक प्रकरणात लोकांना फसवण्यात येत होते.
मेसेजमध्ये त्या व्यक्तीला आणि त्याच्या जोडीदाराला ताज हॉटेलमध्ये 7 दिवस राहण्यास सांगण्यात आले होते. अशा परिस्थितीत अशा फसवणुकीच्या संदेशांपासून सावध राहा. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडेल.