बिग ब्रेकिंग : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! या प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धू यांना १ वर्षाचा कारावास

Published on -

दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटर आणि काँग्रेस पक्षाचे पंजाबचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वाचा निकाल दिला आहे. त्यामुळे नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने ३४ वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणाचा निकाल दिला आहे. नवज्योत सिंग सिद्धू रोडरेज (Road Rage Case) प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी केली.

नवज्योत सिंग सिद्धू आणि त्याच्या मित्रामध्ये पटियाळा येथील कार पार्किंगवरून वादामध्ये (Car parking dispute) ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सिद्धूला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा (1 year imprisonment) ठोठावण्यात आली आहे.

पण सुप्रीम कोर्टाने नवज्योत सिंग सिद्धू याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. मात्र मृतकाच्या कुटुंबाने पुन्हा कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला आहे.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर सत्र न्यायालयाने पुरावे नसल्याने सिद्धूला 1999 साली निर्दोष ठरवले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. हायकोर्टाने 2006 साली सिद्धूला 3 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड केला होता.

या विरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 16 मे 2018 रोजी हत्येचा हेतू नसल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला आरोपातून मुक्त केले. पण आयपीसी कलम 323 नुसार दोषी ठरवले. यामुळे तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही फक्त 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News