Chandra Grahan : सावधान! ‘या’ राशींवर होणार चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम, काळजी घ्या नाहीतर..

Published on -

Chandra Grahan : यावर्षातले पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी दिसणार असून हे ग्रहण काही राशींसाठी खूप फायद्याचे असणार आहे. तर काही राशींसाठी खूप नुकसानकारक असणार आहे. काही लोकांना चांगले दिवस येऊन त्यांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील.

तर काहींना खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. नाहीतर त्यांना अजून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात सविस्तरपणे.

या राशींवर होईल परिणाम

मेष

चंद्र हा मनाचा कारक असल्याने त्याचा प्रभाव मानसिकदृष्ट्या जास्त राहणार असल्याने या राशीचे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतील. त्यामुळे ते अनेक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. तसेच आर्थिकदृष्ट्याही या राशीचे लोक कमकुवत राहतील. त्यामुळे यावेळी कोणाशीही वाद घालू नका.

वृषभ

चंद्र ग्रहणाचा विपरीत परिणाम वृषभ राशीवर होणार आहे. या राशीचे लोक या काळात सतत कर्ज घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करू वाटणार नाही. ज्याचा तुमच्या कामावर वाईट परिणाम होईल. तसेच या राशीच्या लोकांनी बोलण्यावर संयम ठेवावा.

कर्क

चंद्र हा कर्क राशीचा स्वामी असून या राशीवर या ग्रहणाचा प्रभाव अशुभ होणार आहे. या काळात कर्क राशीला आरोग्याशी निगडित अनेक समस्या येऊ शकतात. तसेच तुमच्या नोकरीतही समस्या निर्माण होतील. त्यामुळे या राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करावी.

सिंह

सिंह राशीवरही चंद्र ग्रहणाचा अशुभ प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या काळात कौटुंबिक समस्या निर्माण शकतात. या राशीच्या लोकांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे. येत्या काळात काही वाईट बातम्याही मिळू शकतात, त्यामुळे स्वत:ला खंबीर ठेवून सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe