Children’s Money Back Policy of LIC : बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे महत्व जसे वाढत चालले आहे तसेच हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा विमा पॉलिसी असेल यांचेही महत्व वाढत चालले आहे. गुंतवणूक व विमा पॉलिसी यासाठी सेफ जागा म्हणजे LIC .
LIC मध्ये तुम्हाला एक से बढकर एक गुंतवणुकीचे प्लॅन मिळतील. हे प्लॅन प्रत्येक वयोगटानुरूप गरजा लक्षात घेऊन तयार केले आहेत. तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी तुम्ही जर विचार करत असाल तर LIC न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन हा एक चांगला पर्याय आहे.
0 ते 12 वयोगटातील मुलाचे पालक हा प्लॅन खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या मुलाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. चला याबद्दल जाणून घेऊयात –
ही योजना नॉन-लिंक्ड मनी बॅक योजना आहे. एलआयसीच्या ही स्कीम मॅच्युरिटी बेनिफिट, सर्व्हायव्हल बेनिफिट आणि डेथ बेनिफिटसह येते. तुमचे अपत्य 25 वर्षांचे झाले की ही पॉलिसी मॅच्युअर होईल. समजा तुमचे मुलं 9 वर्षांचे आहे.
वयाच्या 9 व्या वर्षी तुम्ही ही पॉलिसी घेतली तर 16 वर्षांनी म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षी ती मॅच्युअर होईल. म्हणजे तुमचे मुलं वयाच्या 25 व्या वर्षीच आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होईल.
या पॉलिसीविषयी आणखी सविस्तर माहिती
या पॉलिसीचा प्रिमिअम तुम्ही तुमच्या सोयीनुसार भरू शकता. यासाठी तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर प्रिमिअम भरू शकता. या पॉलिसीच्या अगेन्स्ट तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे बेनिफिट मिळतील.
यातील पहिला बेनिफिट म्हणजे सर्वाइवल बेनिफिट. जेव्हा विमाधारक व्यक्ती विशिष्ट वयापर्यंत पोहोचते तेव्हा मूळ विमा रकमेच्या 20 टक्के इतका सर्व्हायव्हल लाभ दिला जातो. दुसरा बेनिफिट आहे मॅच्युरिटी बेनिफिट.
यामध्ये विम्याच्या रकमेइतका मॅच्युरिटी बेनिफिट दिला जाईल आणि या कालावधीत कमावलेले सर्व बोनस दिले जातील. तिसरा बेनिफिट म्हणजे डेथ बेनिफिट. या बेनिफिट अंतर्गत जर एखाद्याचा दुर्दैवी परिस्थिती निधन झाले, तर देय रक्कम मृत्यू बोनससह संपूर्ण विमा रक्कम वारसाला मिळेल.