CNG Rate Today : आता काय करायचं ? महाराष्ट्रातील ह्या शहरात डिझेलपेक्षाही सीएनजी झालाय महाग !

Published on -

CNG Rate Today :पेट्रोल, डिझेलनंतर आता सीएनजी देखील शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली वाढ पाहता येत्या काळात सीएनजी आणखी महागेल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच दरवाढ करण्यात आलीय.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता, वाहनधारकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय निवडला. परंतु, मागील काही महिन्यांत सीएनजीच्या किमती झपाट्याने वाढून त्या पेट्रोल आणि डिझेलच्या बरोबरीला आल्या.

त्यातच आता मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील नाशिक शहरात सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलच्या दरापेक्षा सीएनजीचा दर वाढला असून, तो आता प्रतिकिलो ९६.५० रुपयांवर पोहोचला आहे.

पीएनजीच्या दरातही ३ रूपयांनी वाढ झाली आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मे महिन्यात तत्कालीन सरकारच्या वतीने सीएनजी, पीएनजीवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याबाबत तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा देखील केली होती. सीएनजीवर व्हॅट कपात करण्यात आल्याने सीएनजीचे दर सहा रुपयांनी, तर पीएनजीचे दर साडेतीन रुपयांनी कमी झाले होते.

सीएनजी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पन्हा सीएनजीच्या दरात वाढ झाली. गेल्या चार महिन्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो ३१ रुपयांनी वाढले आहेत.

काही महिन्यांपूर्वी शहरात सीएनजीचे दर प्रतिकिलो ८३ रुपये इतके होते. त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हेच दर तीन रुपयांनी वाढून ८६ रुपयांवर पोहोचले. आता एक किलो सीएनजीसाठी ९६.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो ७१ रुपये इतके होते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस १० रुपयांनी, तर जून महिन्यात चार रुपयांनी वाढ झाली होती.

यानंतर आता पुन्हा चार रुपयांची वाढ झाली आहे. पीएनजीच्या दरात तीन रूपयांची वाढ झाली असून, आता पीएनजीच्या एका किलोसाठी ५२.५० पैसे मोजावे लागणार आहेत.

शहरात सीएनजी वाहने वाढत असताना पुरेशा प्रमाणात गॅसची उपलब्धता होत नाही. सीएनजी घेण्यासाठी भल्या सकाळपासून पंपांवर वाहनांच्या रांगा लागतात. गॅस संपुष्टात आल्यावर रांगेतील वाहनधारकांना माघारी फिरावे लागते.

कुठे किती दर? सोमवारी पुण्यामधील सीएनजीच्या दरातही 4 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे पुण्यातील सीएनजीचे दर हे 91 रुपये प्रतिकिलो झाले होते. त्यानंतर आता मुंबईतही सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीय. पुण्याच्या तुलनेत मुंबईतील सीएनजीची किंमत 2 रुपये अधिक वाढवण्यात आलीय. मुंबई आणि पुण्यापेक्षाही सीएनजीची किंमत ही नाशिकमध्ये सर्वाधिक आहे. नाशिकमध्ये सीएनजी प्रतिकिलो 95.50 रुपये इतका महाग झालाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News