Indonesia: इंडोनेशियामध्ये (Indonesia) फुटबॉल सामन्यादरम्यान (football match) उसळलेल्या हिंसाचारात 129 जणांचा मृत्यू (129 people died) झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियन पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार ही घटना पूर्व जावा (east java) येथील आहे. वृत्तसंस्थेनुसार, पूर्व जावा येथील एका फुटबॉल मैदानावर फुटबॉलचा सामना सुरू होता. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावर पोहोचले होते. फुटबॉल सामन्याचा निकाल येताच मैदानात सामना पाहण्यासाठी आलेले चाहते संतप्त झाले. संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/10/Indonesia-football-match.jpg)
संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानात घुसून मारामारी सुरू केली. सर्वत्र गोंधळ माजला होता. पूर्व जावा पोलिसांचे प्रमुख निको एफिंटा (Nico Efinta) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेत 34 जणांचा जमिनीवर मृत्यू झाला होता. ईस्ट जावा पोलिसांचे प्रमुख निको एफिंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित लोकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पर्स्बाया सुराबाया (Persabaya Surabaya) आणि अरेमा एफसी यांच्यातील सामना इंडोनेशियाच्या पूर्व जावा येथील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात अरेमा एफसी संघाचा पराभव झाला. संघाच्या पराभवानंतर संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसून हाणामारी सुरू केली. या हिंसाचारात दोन पोलिसांचाही मृत्यू झाला आहे.
फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि इंडोनेशियन नॅशनल आर्म्ड फोर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि कसेतरी खेळाडूंना सुरक्षितपणे मैदानाबाहेर काढले.