मुस्लिम लोकसंख्या असूनही ‘या’ 8 देशात नाही एकही मशिद, सरकारनेच घातलीये मशि‍दीवर बंदी!

Published on -

जगात विविध धर्मांचे अनुयायी राहत असले तरी काही देश आजही धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत मर्यादांमध्ये अडकलेले दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही अशा देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या अस्तित्वात आहे, परंतु त्यांना मशिद बांधण्याची परवानगी नाही. या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण असलं, तरी ती एक वस्तुस्थिती आहेआणि त्यामुळे धार्मिक समावेश, स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात.

व्हॅटिकन सिटी

जगातील काही लहान देश अशा यादीत येतात, जिथे मुस्लिम लोक राहत असले तरी त्यांना मशिदीसारखं एक मूलभूत धार्मिक स्थळ बांधण्याची मुभा नाही. व्हॅटिकन सिटी हे त्याचं प्रमुख उदाहरण. पूर्णपणे कॅथोलिक ख्रिश्चन धर्माला समर्पित असलेला हा देश, इतर धर्मांच्या धार्मिक स्थळांसाठी जागा देण्यास मनाई करतो. त्याच पावलावर पाऊल ठेवणारा मोनाकोही मशिदींच्या बाबतीत संकुचित धोरण ठेवतो, जरी तिथे अनेक मुस्लिम नागरिक राहतात.

 

उरुग्वे, साओ टोम आणि प्रिन्सिप आणि एस्टोनियासारख्या देशांमध्ये मुस्लिम लोकांची संख्या फारशी नसली तरी, त्यांच्या धार्मिक गरजांकडे अजूनही फारसे लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे येथील मुस्लिम समाज अनेकदा घरातच अथवा खासगी इस्लामिक केंद्रांमध्ये प्रार्थना करतो.

स्लोवाकिया

स्लोवाकियाचा अनुभव मात्र अधिक स्पष्टपणे धार्मिक असहिष्णुतेकडे निर्देश करतो. इथे इस्लाम धर्माला अधिकृत मान्यता नाकारण्यात आली असून, मशिदी उभारण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 2016 मध्ये या देशाने पारित केलेल्या कायद्यानुसार, मुस्लिम समुदायाचे अधिकार मर्यादित केले गेले.

सॅन मारिनो आणि भूतान

सॅन मारिनो आणि भूतान या देशांमध्ये मुस्लिमांची संख्या खूप कमी आहे, तरीही ते त्यांच्या धर्माचे पालन करतात. भूतानमध्ये मुस्लिम व ख्रिश्चन दोघेही अनेक वर्षांपासून धार्मिक स्थळांची मागणी करत आहेत, पण अद्यापही सरकारकडून याला मान्यता मिळालेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!