Dream Interpretation : कोट्यवधी लोकं दररोज स्वप्न (Dream) पाहतात तर काही जण स्वप्नांच्याच दुनियेत जगत असतात. स्वप्न पाहणे मानसिकदृष्ट्या चांगले (Mental Health) असते. स्वप्न सकारात्मकता (Positivity) देतात.
बरेच जण स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचा दैनंदिन आयुष्याशी (Life) संबंध जोडतात. या गोष्टींचे काही ना चांगले वाईट संकेत (Hint) असतात. (Dream Interpretation)
1.साप –
जर तुम्हाला स्वप्नात एखादा साप (Snake) तुमच्या दिशेने येताना दिसला तर समजा तुमचा कोणीतरी शत्रू जवळ आला आहे. हे लोक तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहिले पाहिजे.
2.वधू –
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात वधू (bride)दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रतिस्पर्ध्याशी समेट करणार आहात. म्हणजेच वाद झाल्यानंतर परस्पर संमतीने त्यावर तोडगा निघू शकतो.
3.कॅक्टस प्लांट –
जर तुम्हाला स्वप्नात कॅक्टसचे रोप (Cactus plant) दिसले तर ते खूप वाईट लक्षण आहे. म्हणजे तुमच्या जीवनात अडथळे येणार आहेत. हे तुमच्या आनंदी घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचे लक्षण देखील असू शकते. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो किंवा वैवाहिक जीवन बिघडू शकते.
4.विझलेला दिवा –
जर तुम्हाला स्वप्नात विझलेला दिवा दिसला तर हे देखील अशुभ लक्षण आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात उलथापालथ होणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असू शकतात. या कठीण काळात तुम्ही एकटे राहू शकता.
5.डोंगरावरून खाली पडणे –
जर तुम्ही स्वतःला डोंगरावरून खाली पडताना दिसले तर ते जीवनातील पडझडीचे लक्षण असू शकते. तुमच्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. मान-सन्मानात घट होऊ शकते. अशी स्वप्ने जीवनातील काही वाईट टप्प्याचे लक्षण आहेत.
6.मेलेले पाहणे –
कधी कधी काही आठवणींमुळे मेलेले लोकही स्वप्नात येतात. अशी स्वप्ने दुःख किंवा पश्चात्तापाची भावना व्यक्त करतात. काही लोकांचा अकाली मृत्यू होतो आणि त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. म्हणूनच ते स्वप्नात आमच्याकडून मदतीची अपेक्षा करतात.