Farming Business Idea: गावातच सुरु करा हे शेतीपूरक व्यवसाय अन कमवा लाखों; वाचा याविषयी

Ahmednagarlive24 office
Published:

Farming Business Idea:भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती व शेती संबंधित व्यवसायावर (Agriculture Business) अवलंबून असून त्यांचे सर्व अर्थकारण शेती व शेतीपूरक व्यवसायावरच आहे. खरं पाहता शेती व शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

हीच बाब लक्षात घेऊन आज आपण गावात राहून सुरू करता येणारे शेतीपूरक व्यवसाय जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करता येणे शक्य होईल. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी.

शेतीसमवेतचं सुरु करता येणारे व्यवसाय
धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय

मित्रांनो जर तुम्ही गावात राहून शेतीपूरक व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहात असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो तुम्ही गावात राहून धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु करू शकता. सुरुवातीला या व्यवसायासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागणार आहेत.

याशिवाय तुमच्याकडे धान्य साठवण्यासाठी गोदाम असणे आवश्यक आहे. या व्यवसायासाठी आपले गावातील शेतकऱ्यांशी चांगले संबंध असणे आणि त्यांच्याकडून धान्य खरेदी करून गोदामात साठवणे आवश्यक आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांना अन्नधान्य विकताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे ते त्यांचे पीक मध्यस्थांना विकतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याकडून धान्य खरेदी करून तुमच्या गोदामात साठवून ठेवू शकता आणि जेव्हा बाजारभाव जास्त असेल तेव्हा ते विकून चांगला नफा कमवू शकतात.

खत आणि बियाणे विक्री व्यवसाय
भारता शेतीप्रधान देश आणि गावात बहुतांशी शेतीची कामे केली जातात. शेतकऱ्यांना खते, बियाणे घेण्यासाठी शहरात जावे लागते. प्रवासासाठी पैसे लागतात. शेतकऱ्यांना गावातच माफक दरात खते आणि बियाणे मिळतील, तर त्यांना शहरात जावे लागणार नाही.

हे लक्षात घेऊन तुम्ही खते आणि बियाणे विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी तसेच तुमच्यासाठीही फायदेशीर ठरेल. एवढेच नाही तर हा व्यवसाय वर्षभर चालतो. कारण रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची गरज असते.

कुक्कुटपालन व्यवसाय
गावात किंवा तुम्ही तुमच्या शेतात कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री फार्म उघडू शकता. याद्वारे तुम्ही शेतीसोबतच कुक्कुटपालनाचा व्यवसायही सांभाळू शकाल. आज बाजारात चिकनच्या अंडी आणि मांसाला मोठी मागणी आहे. कुक्कुटपालनासाठी शासनाकडून अनुदानही मिळते.

जर तुमच्याकडे पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. याशिवाय, आजकाल अनेक कंपन्या आहेत ज्या कुक्कुटपालन करतात आणि त्या बदल्यात तुम्हाला चांगले कमिशन देतात. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, पोल्‍ट्री फार्म उघडण्‍यासाठी तुमची स्‍वत:ची जमीन असेल तेव्हाच या कंपन्या तुम्‍हाला टेंडर देतील. कंपन्या तुम्हाला सर्व गोष्टी पुरवतील. तुम्ही ते व्यवस्थापित करून विकू शकता. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून कमिशन मिळेल.

शेळीपालन व्यवसाय
गावात शेळीपालनाचा व्यवसाय हा अत्यंत कमी पैशात सुरू केला जाणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय कमी खर्च आणि चांगला नफा देणारा आहे. शेळीच्या दुधाला आणि मांसाला बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत तुम्ही जर हा व्यवसाय सुरु केला तर चांगली बंपर कमाई होउ शकते.

यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. एवढेच नाही तर शेळीच्या आहारासाठी कोणत्याही विशेष व्यवस्थेची गरज नाही. वन्य वनस्पतींची पाने खाऊन शेळी आपला उदरनिर्वाह करत असते. यामुळे हा कमी भांडवलात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe