अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
त्यांच्या विरोधात मुंबईच्या माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आहे कारण याबाबत अधिक माहिती अशी,

मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले आहेत असं नमूद केलं आहे.
दरम्यान महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘नाय वरन-भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट अलिकडच्या काळात प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटातील बऱ्याच दृश्यांना विरोध झाला होता. या चित्रपटात काही अल्पवयीन मुलांची दृश्य देखील आहेत ज्यावर आक्षेपही घेण्यात आला होता.
त्यावरुनच महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप महेश मांजरेकर यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.