पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं निधन

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचं दीर्घ आजारानं निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. १९९९ मध्ये त्यांनी लष्कराच्या बळावर पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती.

मुशर्रफ यांनी २००१ ते २००८ दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून कार्यभार पाहिला. महाभियोगाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मुशर्रफ यांनी २००८ मध्ये राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. मुशर्रफ यांना २०१९ मध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

मुशर्रफ यांनी संविधानाची पायमल्ली करत आणीबाणी जाहीर केल्याबद्दल वर्ष २००७ मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाझ) देशद्रोहाचा खटला दाखल केला होता.