वसीम अक्रम ते धोनी…’या’ क्रिकेटपटूंच्या प्रेमात वयाचं बंधन कुठेच नव्हतं; एक तर पत्नीपेक्षा 5 वर्षांनी लहान!

Published on -

क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांचा वर्षाव करणारे स्टार खेळाडू मैदानाबाहेरही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. विशेषतः त्यांच्या लग्न आणि प्रेमकथाही चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. पण या यशस्वी क्रिकेटपटूंमध्ये असे काही जण आहेत, ज्यांच्या जोडीदारांच्या वयात बराच मोठा फरक आहे. कुणी स्वतःपेक्षा लहान जोडीदार निवडला, तर काहींनी स्वतःपेक्षा मोठा आयुष्यसाथी निवडला. या लेखात आपण अशाच पाच क्रिकेटपटूंच्या जोड्यांबद्दल पाहणार आहोत, जिथे वयाचा मोठा फरक असूनही प्रेम अधिक गहिरं ठरलं आहे.

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांचं नातं अनेकांसाठी आदर्श ठरलं आहे. दोघांच्या वयात 7 वर्षांचा फरक आहे. धोनी सध्या 43 वर्षांचा आहे, तर साक्षी 36 वर्षांची आहे. हे जोडपं 2007 मध्ये भेटलं, जेव्हा साक्षी एका हॉटेलमध्ये इंटर्न होती. त्या भेटीनंतर दोघांची पुन्हा भेट झाली, आणि काही वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी लग्न केलं. आज हे जोडपं भारतात सर्वाधिक लोकप्रिय कपल्सपैकी एक मानलं जातं.

शोएब मलिक आणि सना जावेद

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने नुकतीच अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं. शोएब आणि सना यांच्यात 11 वर्षांचा वयाचा फरक आहे. शोएब 43 वर्षांचा असून सना 32 वर्षांची आहे. याआधी शोएबचं लग्न भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी झालं होतं, आणि त्यांना एक मुलगाही आहे. मात्र काही वर्षांत हे नातं तुटलं आणि शोएबने तिसऱ्यांदा लग्न केलं.

ग्लेन मॅकग्रा आणि सारा लिओनार्डी

ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सारा लिओनार्डीशी लग्न केलं. सारा आणि मॅकग्रा यांच्यात तब्बल 12 वर्षांचं अंतर आहे. मॅकग्रा सध्या 55 वर्षांचे आहेत, तर सारा 43 वर्षांची आहे. दोघांची पहिली भेट 2009 मध्ये IPL दरम्यान झाली आणि लवकरच ही मैत्री प्रेमात बदलली. 2010 मध्ये त्यांनी लग्न केलं.

सचिन तेंडुलकर आणि अंजली

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरही आपल्या पत्नीपेक्षा वयाने लहान आहे. अंजली तेंडुलकर त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. सचिन सध्या 52 वर्षांचा असून अंजली 57 वर्षांची आहे. त्यांची प्रेम कहाणी देखील रंजक आहे.

वसीम अक्रम आणि शॅनिएरा थॉम्पसन

स्विंगचा बादशहा वसीम अक्रम याने आपल्या दुसऱ्या लग्नात वयाचा सगळ्यात मोठा फरक पाळला. त्याने ऑस्ट्रेलियन मुलगी शॅनिएरा थॉम्पसनशी विवाह केला. वसीम अक्रम 59 वर्षांचे आहेत, तर शॅनिएरा 43 वर्षांची आहे. दोघांमध्ये 16 वर्षांचा फरक असूनही, त्यांच्या नात्यात सौहार्द आहे. अक्रमच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर शॅनिएरा त्यांच्या आयुष्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!