बॉक्स ऑफिसवर गंगुबाईंचा बोलबाला…पाच दिवसात कमावले इतके कोटी

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता ५ दिवस झाले आहेत.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. ‘नुकतेच राज्यांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टी असल्याने चित्रपटाने चांगलीच कमाई केली.

या प्रमाणे ५ दिवसात बॉक्स ऑफिसवर एकूण ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंतचे आकडे पाहता पहिल्या आठवड्यात हा चित्रपट ७० कोटींहून अधिकची कमाई करू शकतो, असे मानले जाते.

मात्र, सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी चित्रपटाची कमाई कशी होते यावर ते अवलंबून असेल. दरम्यान आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe