Indian Railways : देशातील कित्येक जण दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चिक आणि आनंदायी असतो. अशातच रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन नियम आणि सोयी उपलब्ध करून देत असते.ज्याचा फायदा प्रवाशांना होतो.
जर तुम्हीही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता काही वर्षांत देशाला रेल्वेचे नवीन रूप पाहायला मिळणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

वंदे भारतची केली विमानाशी तुलना
रेल्वेमंत्री म्हणाले की, “जर वंदे भारत ट्रेनची तुलना विमानाशी केली तर विमानापेक्षा वंदे भारत ट्रेनमध्ये ध्वनी प्रदूषण 100 पटीने कमी आहे. ट्रेनचा प्रवास हा प्रवाशांसाठी अतिशय आरामदायी आणि आनंददायी प्रवास आहे. या ट्रेनमध्ये झटके बसत नाही, पिकअप खूप चांगले आहे. ट्रेन 52 सेकंदात आपला वेग पकडते. वंदे भारत ही जगातील सर्वोत्कृष्ट ट्रेन मानली जाते.”
रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती
रेल्वेमंत्री म्हणाले की, वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा देशातील अभियंते, तंत्रज्ञ, वेल्डर आणि फिनिशर्सवरचा विश्वास सिद्ध झाला असून आता मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्याने याचा फायदा दररोज हजारो प्रवाशांना होणार आहे. हे मुंबई, सोलापूर, शिर्डी, दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुदुरवाडीच्या आसपासच्या प्रवाशांना सेवा देईल.
पंतप्रधान मोदींनी दाखवला ग्रीन सिग्नल
पंतप्रधान मोदींनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारतच्या मुंबई-शिर्डी दरम्यानचा सरासरी वेग ताशी 60 किलोमीटर इतका असणार आहे. तर मुंबई ते सोलापूर दरम्यान या ट्रेनचा सरासरी वेग सुमारे 70 किमी प्रतितास असणार आहे.