Indian Railways : जर तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. कारण रेल्वे मंत्रालयाकडून आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद या रेल्वे स्थानकावर विमानतळासारखी सुविधा उपलब्ध होणार आहे. लवकरच या स्थानकाचे चित्र बदलले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना होणार आहे. येत्या काळात स्टेशन पंचतारांकित मॉलसारखे आपल्याला दिसेल.
आता विमानतळाप्रमाणे चमकणार रेल्वे स्थानक
गाझियाबाद रेल्वे स्थानक आता विमानतळाप्रमाणे चमकणार असून याबाबत रेल्वे मंत्रालयाने नवीन रेल्वे स्थानकाच्या मॉडेलचे चित्रही प्रसिद्ध केले आहे. या चित्रात गाझियाबादचे जुने रेल्वे स्टेशन विमानतळासारखे चमकताना दिसणार आहे.
नवीन रेल्वे स्थानकाची प्रशासकीय इमारत ही तीन मजली असणार आहे. रिझर्व्हेशन काउंटर, तिकीट काउंटर, चौकशी केंद्र, वेटिंग हॉल नवीन डिझाइनमध्ये अपग्रेड केले जाणार आहे. नवजात मुलांसाठी स्वतंत्र खोलीचीही व्यवस्था केली आहे.
करण्यात येणार एस्केलेटर आणि लिफ्टचीही व्यवस्था
स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी एक फूट ओव्हरब्रिज बांधला जाणार असून, जो आधीपासून बांधलेल्या धोबीघाट आरओबीला जोडण्यात येणार आहे. यामुळे आता प्रवाशांना लाउंजमधून थेट प्लॅटफॉर्मवर ये-जा करता यावी अशा पद्धतीने नवीन फूट ओव्हरब्रिज बनवण्यात येणार आहे.
इतकेच नाही तर एस्केलेटर आणि लिफ्टची व्यवस्था असणार आहे. तसेच संपूर्ण रेल्वे स्टेशनवर वाय-फाय असणार आहे. दिव्यांग आणि वृद्धांसाठी व्हील चेअर उपलब्ध असणार आहेत. ब्रँडेड कंपन्यांचे फूड कोर्ट असणार आहे. गाझियाबाद रेल्वे स्थानकावर 6 प्लॅटफॉर्म आहेत.
400 पेक्षा जास्त गाड्यांची ये-जा
या स्थानकावरून दिवसाला 400 पेक्षा जास्त गाड्या जातात. यापैकी या स्थानकावर सुमारे 200 गाड्या थांबतात. दिल्लीनंतर एनसीआरमध्ये दुसरे कोणतेही मोठे रेल्वे स्टेशन असेल तर ते फक्त गाझियाबाद आहे. गाझियाबादमध्ये वाहनांचा ताण कमी करण्यासाठी आनंद विहार रेल्वे स्थानक बांधले असून आता अशा अनेक गाड्या आहेत ज्या आनंद विहारमार्गे देशाच्या वेगवगळ्या भागात जातात.