अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- TCL आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच करणार आहे. या स्मार्टफोनला सध्या अल्ट्रा फ्लेक्स असे नाव देण्यात आले आहे. हे ३६०-डिग्री रोटेटिंग हिंज वापरून आत किंवा बाहेर दुमडले जाऊ शकते.
दरम्यान TCL ने दोन डिव्हाइस सादर केली आहेत. एक डिव्हाइस प्रोटोटाइप असून त्याची स्क्रीन आत आणि बाहेर करता येऊ शकते. दुसरे उपकरण फोल्ड करण्यायोग्य आहे. या फोल्डेबल फोनमध्ये २,४६०×१,८६० रिझोल्यूशनसह ८-इंचाचा PLP AMOLED डिस्प्ले आहे.

दोन्ही डिव्हाइस सध्या फक्त संकल्पना आहेत. हे अद्याप उत्पादन श्रेणीत आलेले नाहीत. त्यानंतर TCL ने सांगितले की हे अल्ट्रा फ्लेक्स प्रथमच प्रदर्शित केले जाणार आहे, तर फोल्ड एन’ रोल यापूर्वी केवळ चीनमध्येच प्रदर्शित करण्यात आले होते.
अल्ट्रा फ्लेक्स आणि फोल्ड एन रोल
३६०-डिग्री अल्ट्रा फ्लेक्स हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेला Samsung Galaxy Z Fold 3 आणि Microsoft Surface Duo 2 सारखे आहे.
पण TCL चा फोन हा विरुद्ध दिशेलाही फिरवला जाऊ शकतो. कव्हर डिस्प्ले नसल्यामुळे फोनची बॅक-फोल्डिंग क्षमता एका हाताने तुम्हाला हे डिव्हाइस वापरता येईल.
TCL प्रत्यक्षात फोल्डेबल फोनची विक्री कधी सुरू करणार हा प्रश्न आहे. आणि जर TCL ने फोल्डेबल फोन लाँच केला, तर तो कमी म्हणजे ५० ते ५५ हजार रुपयांना विकण्याचा त्यांचा मानस आहे.