RAW एजंट कसे तयार होतात? भरती कशी होते? काय असते पात्रता? वाचा संपूर्ण माहिती

Published on -

जेव्हा-जेव्हा देशातील शुरांच्या कथा ऐकायला मिळतात, तेव्हा-तेव्हा RAW एजंटची नावे ऐकायला येतात. नुकतेच भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानला समोरासमोर शह दिल्याच्याही चर्चा ऐकायला आल्या. परंतु भारत-पाकिस्तानमधील तणावात समोरासमोर युद्ध न करताही, अनेक RAW एजंटांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, असे सांगितले जाते. हे RAW एजंट कोण असतात व ते कसे तयार होतात, याच विषयाची माहिती आपण घेऊ…

कोण असतात RAW एजंट?

भारताच्या बाह्य गुप्तचर कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी RAW एजंट तयार केले जातात. हे विशेष प्रशिक्षित आणि तज्ज्ञ असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गोपनीय मोहिमांमध्ये ते सहभाग घेतात. देशाची सुरक्षा, दहशतवादासोबत लढाई हे रॉ एजंटांचे मुख्य काम असते.

रॉ एजंट कसे तयार होतात?

रॉ एजंट बनणे सोपे काम नसते. त्यासाठी यूपीएससी, एसएससी सारख्या कठीण परीक्षा द्याव्या लागतात. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) मध्ये अधिकारी होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया नसते. किमान पदवी, परदेशी भाषा, संगणक ज्ञान त्यासाठी आवश्यक असते. यात जास्तीत जास्त 56 वर्षांच्या आतील युवक घेतले जातात. RAW मध्ये नोकरी मिळण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासली जाते.

काय असते पात्रता?

कणखर शरीर, गोपनीयता राखण्याची क्षमता, उत्कृष्ट निर्णय क्षमता, चपळता, परदेशी भाषांचे ज्ञान हे प्राथमिक गुण आवश्यक असतात. युद्ध कौशल्य, शस्त्र कौशल्य हे भरतीनंतर शिकवले जाते परंत ते घेण्याची शारीरीक क्षमता उमेदवारांत असायला हवी.

कशी असते भरती प्रक्रिया?

1. यूपीएससी, आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएस सारख्या गट-अ पदांसाठी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) आयोजित करते. ती उत्तीर्ण करणे आवश्यक असते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे फाउंडेशन कोर्स दरम्यान RAW अधिकारी संभाव्य उमेदवारांची ओळख पटवतात. त्यांनी निवडलेल्या उमेदवारांना मानसशास्त्रीय चाचण्या आणि मुलाखतीसारख्या प्रक्रियांसाठी बोलावले जाते. या मुलाखतीतून राँ एजंटची भरती होते.

2. RAW मध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड गुप्तचर ब्युरो (IB), भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल किंवा लष्करी गुप्तचर यासारख्या इतर सरकारी विभागांमधून देखील केली जाते. लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते.

3. स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) च्या कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) परीक्षेद्वारे किंवा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर (एसीआयओ) परीक्षेद्वारे RAW मध्ये प्रवेश शक्य आहे. संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेद्वारे लष्कर, नौदल किंवा हवाई दलात सामील होणारे अधिकारी देखील RAW मध्ये प्रतिनियुक्तीसाठी पात्र असू शकतात.

भरती असते गोपनिय
ही सगळी भरती प्रक्रिया अत्यंत गोपनिय असते. त्यामुळे या एजंटांबाबत कुठेच काहीच माहिती मिळत नाही. त्यांना पगार किती असतो, ट्रेनिंग कसे होते, याचीही माहिीत उपलब्ध नसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News