Business Idea : प्रत्येक स्वयंपाक घरात जरीचा वापर केला जातो. दिसायला जरी लहान असली तरी या जिरीचे खूप फायदे आहेत. केवळ जेवण बनवण्यासाठी नाही तर आयुर्वेदातही जिरीला महत्त्व आहे. त्यामुळे जिरीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
जर तुम्ही जिरीचा व्यवसाय सुरु केला तर तुमची कमाई महिन्याभरातच हजारो रुपयांच्या वर जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्यवसाय घरच्या घरी तेही कमी खर्चात सुरु करू शकता. तुम्ही हा व्यवसाय कोणत्याही प्रशिक्षणशिवाय सुरु करू शकता.
या झाडाची उंची 15 ते 50 सें.मी. असते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जिरीची शेती खूप खास आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान देशात जिऱ्याची पेरणी करण्यात येते. तसेच फेब्रुवारीमध्ये कापणी केली जाते. ताजे पीक साधारणपणे मार्चमध्ये बाजारात दाखल होते.
जाणून घ्या जिऱ्याच्या चांगल्या जाती
जिरे लागवडीसाठी हलकी आणि चिकणमाती जमीन उत्तम मानली जाते. पेरणीपूर्वी शेत व्यवस्थित तयार करणे खूप गरजेचे आहे. ज्या शेतात जिरे पेरायचे आहेत ते अगोदर तण काढून स्वच्छ करणे आवश्यक आहे.
जिऱ्याच्या चांगल्या जातींमध्ये तीन जाती प्रमुख आहेत. RZ 19 आणि 209, RZ 223 आणि GC 1-2-3 हे वाण चांगले लागवडीसाठी उत्तम आहेत. या जातींच्या बिया अवघ्या 120-125 दिवसांत पिकतात. या जातींचे सरासरी उत्पादन 510 ते 530 किलो प्रति हेक्टर इतके होते. त्यामुळे तुम्ही या वाणांची लागवड केली तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.
किती होते कमाई
भारतातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त जिरे गुजरात आणि राजस्थानमध्ये घेण्यात येते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 28 टक्के जिऱ्याचे उत्पादन राजस्थानात घेण्यात येते. आता उत्पन्न आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी बोलायचे झालं तर जिऱ्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी 7-8 क्विंटल बियाणे होते. जिऱ्याच्या लागवडीसाठी हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपये खर्च येतो.
जिऱ्याची किंमत 100 रुपये प्रतिकिलो मानली तर तुम्हाला यातून हेक्टरी 40,000 ते 45,000 रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. अशा परिस्थितीत 5 एकर जमिनीत जिरे पिकवले तर 2 ते 2.25 लाख रुपये उत्पन्न मिळते.