Indian Railways : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! तिकीट कन्फर्म नसले तरी प्रवास करता येणार, काय आहे योजना? जाणून घ्या

Indian Railways : सणासुदीच्या काळात (Festival season) रेल्वेचे लवकर तिकीट (Railway ticket) मिळत नाही. परंतु, आता याच रेल्वेने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

प्रवाशांना आता तिकीट कन्फर्म (Ticket confirmation) नसले तरी रेल्वेने (Train) प्रवास करता येणार आहे. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) हा निर्णय घेतला आहे.

2015 मध्ये विकास योजना सुरू करण्यात आली. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश ट्रेनमधील (Railways) उपलब्ध बर्थचा अधिक चांगला वापर करणे हा आहे. या योजनेअंतर्गत, प्रतीक्षा यादीत असलेले प्रवासी इतर गाड्यांमध्ये निश्चित बर्थ निवडू शकतात.

या योजनेअंतर्गत, तुम्ही जास्तीत जास्त 7 गाड्यांमध्येच विकास पर्याय निवडू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही बुक केलेल्या ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेपासून 12 तासांच्या कालावधीत धावणाऱ्या ट्रेनमध्ये सीटसाठी अर्ज करू शकता. रेल्वेचा हा नियम सर्व प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी आहे.

ट्रेनमध्ये तिकीट बुक करताना तुम्ही विकास योजनेचा पर्याय निवडल्यास. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला पर्यायी गाड्यांमध्ये जागा मिळते. तुम्हाला मूळ ट्रेनच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट केले जाणार नाही.

तुम्ही IRCTC द्वारे बुक केलेल्या तिकिटांसाठीच तुम्ही विकास योजनेची निवड करू शकता. विकास योजनेअंतर्गत तिकीट बुक केल्यावर, कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता पूर्वीपेक्षा अधिक वाढते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe