भारतातून होणार सर्वाधिक गव्हाची निर्यात ! निर्यातीसाठी इतर देशांबरोबर करार

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Export of wheat :- यंदा च्या वर्षी भारतातून सर्वाधिक गाव्हाची निर्यात करण्यात येणार आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत ३० ते ३५ लाख टन गव्हाची निर्यात करण्याचा करार करण्यात आले आहेत.

भारत हा गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन करणारा जगात २ देश आहे. त्यामुळे भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात करण्यात येते पण रशिया – युक्रेन या दोन्ही देशातील युद्धजन्य परिस्थिती मुळे अनेक देशांपुढे गहू निर्यातीचा प्रश्न उभा राहिला आहे.

त्यातच आपल्या देशाला गव्हाची लागणारी पूर्तता पुर्ण करण्यासाठी भारताबरोबर अनेक देशांकडून निर्यातीचे करार करण्यात येत आहेत.

तर जागतिक व्यापारी बाजारपेठेच्या मागणीच्या अंदाजानुसार या वर्ष ३० ते ३५ लाख टन गव्हाची निर्यात करण्याचा करार केला असल्याची माहिती अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिली आहे.

तर झालेल्या गव्हाच्या निर्यातीच्या कराराची पूर्तता करण्यासाठी भारत सरकार कडून निर्यातीला चालना देण्यासाठी मोहीमा आखण्यात येत आहे.

पण खाजगी व्यापाऱ्यांकडून निर्यातीसाठी गव्हाची खरेदी करण्यात येत असल्यामुळे त्याचा परिणाम सरकारी खरेदीवर होत आहे.

त्यामुळे सरकारी खरेदी कमी होऊ शकते. ही निर्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून करण्यात येणार असून आणखी गव्हाची मागणी वाढली तर व्यापरी हरियाना आणि उत्तर प्रदेशसारख्या इतर राज्यातूनही गहू खरेदी करू शकतात.