Indian Railways : भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. बऱ्याचदा प्रवासी लांब पल्ल्यासाठी दोन रेल्वेचे तिकीट बुक करतात. परंतु, कधी कधी प्रवासादरम्यान पहिली ट्रेन लेट आल्याने प्रवाशांची दुसरी ट्रेन सुटते. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
परंतु, जर तुमच्याही ट्रेनला उशीर झाला तर तुम्हाला स्टेशनवर रात्र घालवावी लागणार नाही. कारण आता तुम्ही फक्त 20 रुपये खर्च करून तुम्हाला हॉटेलसारखी सुविधा मिळेल. अनेकांना रेल्वेच्या या सुविधेबद्दल माहिती नसते. काय आहे रेल्वेची ही अप्रतिम सुविधा? जाणून घेऊयात.

त्यासाठी प्रवाशांना जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. तुम्ही 20 ते 50 रुपये खर्चून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. अनेकांना या सुविधेबद्दल माहिती नसते त्यामुळे त्यांना रेल्वेने दिलेल्या या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
रेल्वेच्या या सुविधेअंतर्गत जर ट्रेनला उशीर झाला तर तुम्ही फक्त 20 ते 50 रुपये खर्च करून रिटायरिंग रूम सहज खरेदी करू शकता. तुम्ही रिटायरिंग रूममध्ये राहिल्यावर तुम्हाला त्यात अनेक उत्तम सुविधा मिळतात.
त्यापूर्वी हे लक्षात घ्या की रिटायरिंग रूमची सुविधा केवळ कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. जर रेल्वेला उशीर झाला तर, प्रवासी 24 किंवा 48 तास रिटायरिंग रूममध्ये राहू शकतात.
जर तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 20 ते 40 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, तुम्हाला वसतिगृहासाठी 10 रुपये वेगळे द्यावे लागणार आहेत.