Kidney Stone; येथे डॉक्टरांच्या पथकाने 54 वर्षीय रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर 206 किडनी स्टोन (Kidney Stone) काढले आहेत. तासाभराच्या शस्त्रक्रियेनंतर हा किडनी स्टोन काढण्यात डॉक्टरांना यश आले.
तेलंगणातील अवेरे ग्लेनेगल ग्लोबल हॉस्पिटल (Aware Gleneagal Global Hospital) मधील डॉक्टरांनी की-होल शस्त्रक्रियेद्वारे नलगोंडा येथील रहिवासी वीरमल्ल रामलक्ष्मीय्या (Veeramalla Ramalakshmiya) यांच्या मूत्रपिंडातील 206 दगड काढले आहेत.

रिपोर्टनुसार, रुग्ण स्थानिक डॉक्टरांकडून औषध घेत होता, ज्यामुळे त्याला काही काळ वेदना कमी होत होत्या. हळुहळु त्याचा त्रास वाढत गेला आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याला आपले काम करतानाही त्रास होऊ लागला.
रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार यूरोलॉजिस्ट डॉ. पूला नवीन कुमार (Dr. Poola Naveen Kumar) म्हणाले, “प्राथमिक तपासणी आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये असे दिसून आले की त्या व्यक्तीच्या मूत्रपिंडाच्या डाव्या बाजूला किडनी स्टोन आहे.
सीटी स्कॅनमध्ये आल्यानंतर किडनी स्टोन असल्याची खात्री झाली. यानंतर, डॉक्टरांनी रुग्णाचे समुपदेशन केले आणि त्याला एक तासाच्या कीहोल शस्त्रक्रियेसाठी तयार केले. या शस्त्रक्रियेत सर्व किडनी स्टोन यशस्वीरित्या काढण्यात आले.
वीरमल्ल रामलक्ष्मीय्या आता शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. डॉ.पूला नवीन कुमार यांनी सांगितले की, रुग्णाला शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे लोकांमध्ये डिहायड्रेशन (Dehydration) ची समस्या वाढू लागते. अशा परिस्थितीत लोकांना शरीर हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
उन्हाळ्यात लोकांनी भरपूर पाणी प्यावे, असे डॉक्टरांनी सांगितले. नारळाच्या पाण्यानेही शरीराला हायड्रेट ठेवता येते. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही टरबूज (Watermelon), ताक, लस्सी किंवा काकडी यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.