लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा दिलासादायी निर्णय

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला होता तो अर्थात एका वर्षात लाडक्या बहिणींना अठरा हजार रुपयांचा लाभ मिळतो.

दरम्यान, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर, लाडकी बहिण योजना ही सातत्याने चर्चेत राहते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. डिसेंबर महिना उलटल्यानंतरही लाडक्या बहिणीच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होत नव्हते आणि यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळाली.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार? हा मोठा सवाल होता आणि अखेर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्यास मान्यता दिली.

आज एक जानेवारी 2026 पासून राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

खरे तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात सोबत जमा होणार अशी माहिती मध्यंतरी समोर आली होती. मात्र प्रत्यक्षात फडणवीस सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात फक्त नोव्हेंबर महिन्याचे दोन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली असून यामुळे लाडक्या बहिणींमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा आहे.

आता लाडक्या बहिणीकडून डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचा लाभ नेमका कधी मिळणार हा सवाल उपस्थित होतोय. खरे तर 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यानंतर 16 जानेवारी 2019 26 रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होईल.

दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रियेला सुरुवात केली आहे आणि यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल त्यांनाच या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे.

नोव्हेंबर चा हप्ता खात्यात जमा झाला असल्याने लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरत आहे आणि फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात आलेले हे नववर्षाचे एक मोठे गिफ्ट सुद्धा आहे.

पण लाडक्या बहिणीकडून डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता नेमका कधी जमा होणार हा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान लाडक्या बहिणींना नोव्हेंबर चा हप्ता फक्त केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तेव्हाच मिळणार असल्याची माहिती समोर आणली आहे. म्हणजेच ज्या लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाहीये.

केवायसीला मुदतवाढ नाहीच 

केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत लाखो लाभार्थ्यांनी केवायसी कम्प्लीट केली मात्र लाखो लाभार्थी असे आहेत ज्यांना मुदतीत केवायसी कम्प्लीट करता आली नाही.

त्यामुळे केवायसी प्रक्रियेला मदत वाढ मिळायला हवी अशी मागणी उपस्थित केली जात होती पण शासनाने अद्याप तरी केवायसीला मुदतवाढ मिळाली असेल याची जाहीर केलेले नाही.

खरे तर केवायसी साठी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची मुदत होती मात्र सुरुवातीच्या टप्प्यात केवायसी करताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि हीच बाब विचारात घेऊन फडणवीस सरकारने केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आणि ही शेवटची मुदतवाढ देखील ठरली आहे.