अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- रियलमीच्या सब-ब्रँड Dizo अंतर्गत DIZO Wireless Power नावाचे नवीन नेकबँड इयरफोन्स लाँच झाले आहेत. कंपनीनं यांची किंमत 1,399 रुपये ठेवली आहे.
परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे इयरफोन्स 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. यांची विक्री 25 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर होईल. जाणून घ्या काय आहेत फीचर्स यात 11.2mm ड्रायव्हर, बेस बूस्ट+ अॅल्गोरिथम, मॅग्नेटिक फास्ट पेयर टेक्नॉलॉजी, गेम मोड, आणि 18 तासांचा प्लेबॅक टाइम असे फीचर्स मिळतात.

या इयरफोन्समध्ये 11.2mm च्या मोठ्या ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. हे ड्रायव्हर्स अॅडव्हान्स Bass Boost+ अॅल्गोरिदमला सपोर्ट करतात. यातील मॅग्नेटिक इयरबड्स एकत्र आल्यावर ईयरफोन्सची पावर ऑफ होते.
तर वेगळे झाल्यावर ऑन होऊन आपोआप फोनशी कनेक्ट होतात. डिजो वायरलेस पावर मध्ये वॉल्यूम व्यतिरिक्त एक कंट्रोल बटन देण्यात आला आहे जो म्यूजिक, कॉल्स आणि गेम मोड कंट्रोल करतो.
सिंगल चार्जवर हे इयरफोन्स 18 तासांचा प्लेबॅक टाइम देतात. तसेच 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा बॅकअप मिळतो. फास्ट चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.