रेशनकार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक सरकारी कामांसाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. तसेच रेशनकार्डच्या माध्यमातूनच स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा लाभ हा मिळत असतो. यामध्ये इतर अनेक फायदे असतात. तसेच केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून देशातील असंख्य रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळतो.
स्वस्तात अन्नधान्य मिळणे शिवाय इतर देखील खूप मोठे फायदे रेशन कार्डच्या माध्यमातून मिळत असतात. आधार- रेशन कार्ड सह लिंक केले तर या योजनांचा लाभ घेता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आधार रेशन कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला देशातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेता येते. त्यामुळे आधार- रेशन कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे. या लेखात आपण घरबसल्या आधार- रेशन कार्ड कसे लिंक करावे याबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
अशा पद्धतीने करा आधार कार्ड- रेशन कार्डशी लिंक
1- सर्वप्रथम uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे.
2- या ठिकाणी गेल्यानंतर स्टार्ट नाऊ या पर्यायावर क्लिक करा.
3- त्या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
4- त्यानंतर रेशन कार्ड बेनिफिट या पर्यायावर क्लिक करा.
5- त्यानंतर पुढे आधार कार्ड क्रमांक, तुमच्या रेशन कार्ड चा नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित नमूद करावा लागतो.
6- हे सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो.
7- हा आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते व त्यानंतर प्रोसेस कम्प्लीट असा मेसेज दिसतो.
8- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आधार रेशन कार्ड सह लिंक होते.