अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान असाच संगमनेर तालुक्यात धुमाकूळ घालणारा एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे.
संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील कारथळवाडी शिवारात हल्ला करीत महिलेस ठार करणारा मादी बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. नरभक्षक बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान मेंढवण शिवारातील कारथळवाडी याठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात हिराबाई एकनाथ बढे (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अखेरीस आज बाबुलाल जमादार पठाण यांच्या वस्तीजवळ लावलेल्या पिंजर्यात भक्ष्याच्या शोधात आलेळा मादी बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला आहे. वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर मादी बिबट्यास निबांळे येथील रोपवाटिकेत हलविले.