गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तीन हजाराहून अधिकांचा अकस्मात मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील 30 पोलीस ठाण्यांत मागील वर्ष 2021 मध्ये तीन हजार 265 व्यक्तींचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यात सर्वाधिक अकस्मात मृत्यूची नोंद राहुरी पोलीस ठाण्यात झाली असून सर्वात कमी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. नैराश्याच्या कारणातून व्यक्ती जीवन संपवितो.

गळफास, विषारी औषध, पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करतो. याची नोंद सुरूवातीला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूमध्ये केली जाते.

मयत व्यक्तीस कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्यास अकस्मात नोंदवरून संबंधित व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला जातो. रस्ता अपघातात मृत्यू होण्याची संख्या मोठी आहे.

याची नोंदही पोलीस ठाण्यात अकस्मात म्हणून केली जाते. तपासाअंती धडक देणार्‍याविरूध्द गुन्हा दाखल केला जातो. गळफास, पाण्यात बुडून, विषारी पदार्थ प्राशन करून किंवा इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला सरकारी अथवा खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीची माहिती पोलीस ठाण्यात कळविली जाते.

रुग्णालयाकडून आलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली जाते. 2021 मध्ये अशा नोंदी झालेल्या मृत्यूंची संख्या तीन हजार 265 इतकी आहे. दरम्यान वर्षभराची आकडेवारी पहिली असता अनैसर्गिकरित्या मृत्यू होणार्‍या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe