अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- येथील नागोरी मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव व एका सभासदावर 13 ते 14 जणांनी ट्रस्टच्या जागेच्या वादातून चॉपर, लाकडी दांडके, शॉकअपसर व पाईपने प्राणघातक हल्ला केला.
कोंड्यामामा चौक येथील हॉटेल कामधेनुसमोर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इक्राम नजीर तांबटकर (वय 40 रा. शहाजीरोड, जुनी घासगल्ली, अहमदनगर), इम्रान शेफी अहमद शेख, युनूस सुलतान तांबटकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
यासर निसार शेख (पवार), यासिम निसार शेख (पवार), माजिद इस्काल शेख (पवार), अरफात इक्बाल शेख (पवार सर्व रा. तांबटकर गल्ली,
शहाजी रोड, अहमदनगर), कामरान कलीम शेख (रा. भिंगार), नबील अब्दुल चाऊस (रा. नटराज हॉटेल शेजारी, अहमदनगर) व अनोळखी सात ते आठ यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी, त्यांचे सहकारी यांचा व आरोपींचा नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या जागेवरून न्यायालयात वाद सुरू आहेत.
त्याच कारणातून आरोपींनी तांबटकर व त्यांच्या साथीदारांवर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम