Jyotish Tips : अनेकांना आपला वाढदिवस किंवा चांगले काहीतरी घडले की दान करायची सवय असते. ही सवय चांगलीच आहे परंतु, हीच सवय आपल्याला उध्वस्त करू शकते.
कारण काही वस्तू ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय कधीच दान करायच्या नसतात. तसेच त्या गिफ्ट म्हणूनही स्वीकारायच्या नसतात. कोणत्या आहेत त्या वस्तू, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ज्योतिषाचार्य पंडित रामदास यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक गोष्टींचे दान करू नये. जर तुम्ही प्रत्येक गोष्टींचे दान केले तर तुमच्यासाठी ते घातक ठरू शकते. उदाहरणाद्वारे सांगायचे झाले तर समजा तुमच्या कुंडलीत शनिचे वर्चस्व असेल तर तुम्ही चुकूनही काळे तीळ, काळी घोंगडी, तेल तसेच शूज इ. गोष्टी कधीही दान करू नये.अशा काही गोष्टी आहेत ज्याचे दान कधीच करू नये. जर तुम्हाला एखाद्या ज्योतिषाने दान करण्यास सांगितले तर ते करा
या गोष्टी कधीही दान करू नका
मीठ
ज्योतिषशास्त्रात मीठ दान करण्यास मनाई केली आहे. समजा जर कधी कुणाला मीठ द्यायचे असेल तर त्या व्यक्तीला त्याबदल्यात काहीतरी द्या.
काळे कपडे
अनेकदा शनी किंवा राहू-केतूची दशा अशुभ असेल तेव्हा काळ्या वस्त्रांचे दान करण्यास सांगितले जाते. जर तसे काहीच नसेल तर कधीच काळे कपडे दान करू नका. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच इतर शुभ ग्रहही बिघडू शकतात. जर तुम्हाला कपडेच दान करायचे असतील तर इतर रंगाचे कपडे दान करा.
लोखंडाचे दान
बऱ्याच वेळा शनीच्या दशेत लोखंडाचे दान किंवा मंदिरात ठेवण्यास सांगितले जाते. जर तुम्ही ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय असे केले तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. लोखंडाचे दान केले तर शनीचा कोप होतो. याचा परिणाम तुमची मालमत्ता आणि बँक बॅलन्ससाठी घातक ठरते. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की शनिवारी कधीही लोखंड खरेदी करू नये.