कितीही बाण पळवा, धनुष्य माझ्याकडेच! उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ठाकरेंपासून वेगळे होत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या १२ खासदारांनी मंगळवारी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आणि शिंदे गटात सामिल झाले. शिवसेनेनेमध्ये निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावरुन तू-तू मै-मै सुरु आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता यावर भाष्य केले आहे.

भाजपला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबडयांची झुंज लावावी तसे शिवसेना आणि त्यातून फुटणाऱ्यांची झुंज लावत आहेत. झुंजीत एक कोंबडा मेला की दुसऱ्याला मारून टाकतील अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजप-शिंदे गटाला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्याचबरोबर सायंकाळी जिल्हा प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांसह पुन्हा ऑनलाइन बैठक घेतली. कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.  या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे पदाधिकारी तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

Shiv Sena, Aditya Thackeray, BJP, Eknath Shinde, MP,शिवसेना, आदित्य ठाकरे, भाजप, एकनाथ शिंदे, खासदार,