जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कांदा आवक वाढली ! वाचा आजचे भाव

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याच्या आवेकत एक हजार गोण्यांनी वाढ झाली. बुधवारी 333 वाहनांतून 60 हजार 452 गोण्या कांदा लिलालावसाठी आला होता.

जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले. बाजारात येणारा सर्व कांदा नवीन लाल प्रकारचा आहे. एक-दोन लॉटला 2800 ते 3000 रुपये भाव मिळाला.

मध्यम मोठा कलर पत्ती कांद्याला 2300 ते 2700 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 2000 ते 2200 रुपये, गोल्टा कांद्याला1500 ते 2000 रुपये,

गोल्टी कांद्याला 1200 ते 1500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 400 ते 500 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 300 ते 400 रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe