Google Search : चुकूनही गुगलवर शोधू नका ‘हे’ विषय, नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा

Published on -

Google Search : आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहित करून घ्यायचे असेल तर आपण आपण लगेच गुगलवर शोधतो. कारण गुगलवर माहितीचा खजिना आहे. तुम्ही कोणत्याही विषयाबद्दल शोधले तर तुम्हाला त्याची अवघ्या काही सेकंदात माहिती मिळते.

त्यामुळे अनेकजण कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगलचा वापर करत आहेत. परंतु, तुम्ही याच गुगलमुळे अडचणीत येऊ शकता. कारण काहीजण गुगलवर नको त्या गोष्टी सर्च करतात, त्यामुळे त्यांना जेलची हवा खावी लागते.

1. पायरेटेड चित्रपट

अनेकजण विनामूल्य चित्रपट पाहण्यासाठी Google चा आश्रय घेतात. परंतु जर तुम्ही असेल केले तर तुमच्यावर  तुरुंगवासाची वेळ येऊ शकते. कारण ते गुन्ह्याच्या श्रेणीत येते त्यामुळे तुम्हाला 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

2. चाइल्ड पॉर्न किंवा बालगुन्हेगारीशी संबंधित सर्च करणे टाळावे 

तसेच चाइल्ड पॉर्न म्हणजेच मुलांशी संबंधित अश्लील सामग्री सोबतच बालगुन्हेगारीशी संबंधित माहिती शोधू नका. भारतात याबाबत कडक कायदा आहे.

POCSO कायदा 2012 च्या कलम 14 अन्वये चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे आणि आपल्याजवळ ठेवणे हा कायदेशीर गुन्हा असून तुम्ही यापैकी कोणत्याही परिस्थितीत पकडला गेला तर तुमच्यावर योग्य कारवाई होऊ शकते. या गुन्ह्यासाठी 5 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

3. बॉम्ब किंवा शस्त्र कसे बनवायचे 

तसेच गुगलवर बॉम्ब किंवा शस्त्र कसे बनवायचे हे सर्च करू नका. त्यामुळे तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारखाली येऊन तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. इतकंच नाही तर प्रेशर कुकर बॉम्ब कसा बनवायचा हे जरी सर्च केले तरी कारवाई होते.

4. गर्भपाताबद्दल सर्च करू नये. 

गर्भपात कसा करायचा हे तुम्ही गुगलवर कधीही शोधू नका, कारण डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे भारतात बेकायदेशीर आहे.  सुरक्षेच्या दृष्टीने असे करणे धोकादायक ठरू शकते. गुगल सर्चमध्ये तुम्हाला अशा पद्धती सापडतील, ज्याद्वारे तुम्ही अडचणीतही येऊ शकता.

5. टाळाव्या या गोष्टी 

तुम्हाला गुगलवर कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृतीबद्दल शोधू नाही. तुम्ही बलात्कार पीडितेचे नाव शोधणे टाळावे, हे देखील बेकायदेशीर आहे. ऑफर शोधू नका, कारण त्यामुळे तुमची बँकिंग माहिती घेऊन तुमची फसवणूक केली जाते. त्यामुळे गुगलवर या गोष्टी शोधणे टाळा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News