अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Pakistan news :- काही काळापूर्वी भारतात दिली जाणारी चौकीदार चोर हैं ही घोषणा आता पाकिस्तानात ऐकायला मिळाली. इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर त्यांच्या सामर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत.
पुन्हा इम्रान खान यांनाच पंतप्रधान केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. इम्रान यांचे सरकार जाण्यात पाकिस्तानी लष्कराप्रमुखांचा हात असल्याचा संशय तेथील नागिरकांना आहे.

त्यामुळे या घोषणांचा रोख लष्कराप्रमुखांकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर आता तेथे शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
तर दुसरीकडे इम्रान खान यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. खान यांच्या विरोधात परकीय शक्तींनी कारस्थान रचल्याचा आरोप करीत लोक रस्त्यावर उतरले.
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाची सभा सुरू असताना काहींनी ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणाबाजी केली.