Pune News : पुणेकरांसाठी दिवाळीच्या आधीच महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे.
आता शहरात हायड्रोजन बस धावताना दिसणार आहे. दिल्ली आणि बडोदा येथे आधीच हायड्रोजन बस सुरू आहे. दरम्यान आता ही बस आपल्या पुण्यातही धावताना दिसणार असून यामुळे प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास प्राधिकरणाकडून व्यक्त केला जातोय.

महत्वाची बाब म्हणजे पुण्यात चालवल्या जाणाऱ्या या हायड्रोजन बसची चाचणी देखील सुरू झाली आहे. बुधवारपासून याची चाचणी सुरू असून एक आठवडा याची ट्रायल घेतली जाणार आहे. त्यानंतर मग ही बस प्रत्यक्षात पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नक्कीच हायड्रोजन बस पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली तर यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार असून या निर्णयाचा शहरातील नागरिकांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे.
पुण्यात सुरू केल्या जाणाऱ्या हायड्रोजन बसची चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईल यांच्या समन्वयाने सुरू करण्यात आली आहे.
ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच पुण्यात ही बस धावणार की नाही हे क्लिअर होणार आहे. ही बस आधीच दोन शहरांमध्ये सुरू आहे म्हणून पुण्यातही याला हिरवा कंदील मिळणार असे बोलले जात आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानातुन ही बस सुरु केली जाईल. आता आपण या गाडीच्या विशेषता समजून घेऊयात.
कशी असणार हायड्रोजन बस?
बुधवारपासून ज्या खास बसची ट्रायल सुरू आहे त्यामध्ये एकूण 35 प्रवासी बसून प्रवास करू शकतील. तसेच यामध्ये दहा प्रवाशांना उभे राहण्याची जागा राहणार आहे.
एक किलो हायड्रोजनमध्ये बस 11 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सात दिवस सुरू असणारी ही चाचणी यशस्वी झाली तर पीएमपीच्या ताफ्यात आपल्याला हायड्रोजनच्या बसेस दिसतील.