Rakshabandhan 2022 : श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण (Rakshabandhan festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर बहिणी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.
गोरखपूर आयटीएम अभियांत्रिकीच्या (Gorakhpur ITM Engineering) दोन विद्यार्थिनींनी नॅनो पार्ट्सपासून (Nano parts) स्मार्ट राखी (Smart Rakhi) बनवली आहे. या राखीमुळे आपत्कालीन (Emergency)परिस्थितीत मदत होणार आहे.
गोरखपूरच्या दोन विद्यार्थिनींनी तयार केली स्मार्ट राखी
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (ITM) गिडा इंजिनीअरिंग कॉलेज, गोरखपूरच्या दोन कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनी पूजा आणि विजया राणी यांनी मिळून एक स्मार्ट राखी तयार केली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडण्याआधी लोकांना सतर्क करण्यात स्मार्ट राखी अतिशय प्रभावी ठरेल, असे पूजाने सांगितले.
बटण दाबल्यावर कॉल चालू होईल
याशिवाय या स्मार्ट राखीच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास राखीतील एक बटण दाबून कुटुंबातील सदस्यांना मेसेज आणि कॉल करता येणार आहेत. यासाठी तुम्हाला त्यावर डबल क्लिक करावे लागेल.
अपघात झाल्यास संदेश पाठविण्यासोबतच रक्तगट आणि औषधांची माहिती शेअर करण्यास हे उपकरण सक्षम आहे. इतकंच नाही तर त्यामुळे डॉक्टरांकडून लवकर उपचारही करता येतात.
ब्लूटूथ सह संलग्न केले जाऊ शकते
मोटारसायकल किंवा चारचाकी चालवताना तुम्ही स्मार्ट मेडिकल सेफ्टी राखी मोबाईलच्या ब्लूटूथला जोडून वापरू शकता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. स्मार्ट मेडिकल राखीमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टर, रुग्णवाहिका किंवा कुटुंबातील सदस्यांचा नंबर सेट करू शकता.
आपत्कालीन परिस्थितीत मेडिकल राखीमधील बटण दाबताच तुमच्या सेट नंबरवर कॉल लोकेशन पाठवले जाते आणि मदत दिली जाते.
जाणून घ्या बनवण्यासाठी किती खर्च आला
ही स्मार्ट राखी बनवण्यासाठी 900 रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये ब्लूटूथ आणि बॅटरीशिवाय नॅनो पार्ट्सचा वापर करण्यात आला आहे. हे एका चार्जवर सुमारे 12 तासांचा बॅकअप देईल. गाडी चालवताना ते ब्लूटूथला जोडले जाऊ शकते.