Indian Railways : प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून देते. तसेच रेल्वेचे काही नियमही आहेत. जे पाळणे प्रत्येक प्रवाशांसाठी गरजेचे आहे.
परंतु, अनेकांना रेल्वेच्या या नियमांबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते. जर तुम्हाला या कारवाईपासून वाचायचे असेल तर नियम जाणून घ्या.
नियमानुसार, तुम्ही 40 ते 70 किलोपर्यंतच्या सामानासह ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. जर तुम्ही ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये प्रवास करत असाल तर नियमांनुसार तुम्ही 40 किलो वजनाच्या सामानासह प्रवास करू शकता.
जर तुम्ही एसी टू टायरमध्ये प्रवास करत असाल तर आपण आपल्यासोबत 50 किलो वजन घेऊ शकता. जर तुम्ही फर्स्ट क्लासने प्रवास करत असाल तर आपण 70 किलो वजनाच्या सामानासह प्रवास करू शकता.
ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही स्टूप, गॅस, स्टोव्ह किंवा कोणत्याही प्रकारची ज्वलनशील सामग्री सोबत नेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण या वस्तू ट्रेनमध्ये नेण्यास मनाई आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनही तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये चढल्यानंतर तिकीट तपासकाकडे जाऊन तुमचे तिकीट सहज खरेदी करू शकता.