मोठ्या ब्रँड्सची नावे ऐकली की आपल्या डोळ्यांसमोर लगेचच मोबाईल, टीव्ही, कार्स, आणि आधुनिक उपकरणांची छबी उभी राहते. पण हीच ब्रँड्स एकेकाळी अगदी वेगळ्या क्षेत्रांमध्ये पाय रोवून उभ्या राहिलेल्या होत्या, जे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार नाही. आज घराघरात पोहोचलेली ही नावं एकेकाळी अगदी साध्या व अनपेक्षित गोष्टी तयार करत होती. ही त्यांच्या प्रवासाची सुरुवात होती – एक अशी सुरुवात जिथून ते आजच्या या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले.
LG ची सुरुवात

एलजीची आजची ओळख टीव्ही, फ्रीज, एसी आणि मोबाईल यांसारख्या हायटेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सशी आहे. पण या कोरियन कंपनीची सुरुवात फारच वेगळी होती. त्यांनी आपला प्रवास एक फेस क्रीम बनवणारी कंपनी म्हणून सुरू केला होता. आजच्या घडीला इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीची ही सुरुवात सौंदर्यप्रसाधनांपासून झाली होती हे अनेकांना माहीतच नसेल.
sony ची सुरुवात
तसेच जपानी ब्रँड सोनी, जो आपल्या क्वालिटी टीव्ही, स्पीकर्स आणि गेमिंग कन्सोलसाठी ओळखला जातो, त्यानेही एक वेगळीच सुरुवात केली होती. सोनीचे पहिले उत्पादन होते – एक राईस कुकर. होय, अगदी स्वयंपाकघरात उपयोगी पडणारी एक साधारण वस्तु. पण त्यानंतर त्यांनी तंत्रज्ञानात पाऊल टाकत एक वेगळीच ओळख तयार केली.
NOKIA ची सुरुवात
नोकिया – हे नाव मोबाईल जगतात एके काळी राजा म्हणून ओळखले जायचे. पण नोकियाने देखील एक अनपेक्षित सुरुवात केली होती. या फिनिश कंपनीचे पहिले उत्पादन होते – टॉयलेट पेपर. म्हणजेच स्वच्छतेशी संबंधित उत्पादने बनवणाऱ्या कंपनीने आता जगभरातील मोबाईल क्रांतीमध्ये आपले स्थान निर्माण केले.
Lamborghini ची सुरुवात
इटलीतील लॅम्बोर्गिनी ही लक्झरी कार्ससाठी ओळखली जाणारी कंपनी, त्यांचे मूळ उद्योग म्हणजे ट्रॅक्टर बनवणे. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी उत्तम ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीने नंतर लक्झरी कार्सच्या बाजारात उतरून इतिहास घडवला.
IKEA ची सुरुवात
स्वीडनची आयकेईए कंपनी, जी आज घरगुती फर्निचर विक्रीत आघाडीवर आहे, तिची सुरुवात मात्र पॅन बनवण्यापासून झाली. एक किचन आयटम विकणारी कंपनी हळूहळू हाय-डिझाईन फर्निचरच्या क्षेत्रात उतरली आणि आज जागतिक बाजारात तिचं मोठं स्थान आहे.
Samsung ची सुरुवात
सॅमसंग या नावाचा संबंध आज आपण मोबाईल, टीव्ही आणि एअर कंडिशनरशी लावतो. पण सॅमसंगची सुरुवात किराणा मालाच्या छोट्याशा दुकानापासून झाली होती. त्या काळात ते साखर, मच्छी आणि नूडल्स विकत होते.
BMW ची सुरुवात
जगप्रसिद्ध बीएमडब्ल्यू म्हणजे उच्च दर्जाच्या लक्झरी आणि स्पोर्ट्स कार्सचा ब्रँड. पण सुरुवातीला, या जर्मन कंपनीने आपलं उत्पादन विमानांच्या इंजिनांपासून सुरू केलं होतं.
या सगळ्या गोष्टी एक महत्त्वाचं सत्य सांगतात – मोठं यश मिळवण्यासाठी सुरुवात कुठून झाली हे फारसं महत्त्वाचं नसतं. प्रत्येक यशस्वी कंपनी मागे एक अशा प्रवासाची कहाणी असते जी संघर्ष, प्रयोग आणि सततच्या बदलांच्या वळणांवरून जाते. या ब्रँड्सनी वेळोवेळी आपली दिशा बदलली, नव्या संधी ओळखल्या आणि त्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली.