Sarkari Yojana Information :PM किसान सन्मान निधी हफ्त्याची तारीख आली, जाणून घ्या ११व्या हफ्त्यातील महत्वाच्या अटी

Published on -

Sarkari Yojana Information : PM किसान सन्मान निधी अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) आनंदाची बातमी (Good News) आहे. तुम्ही ११ व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्या खात्यात हप्ता कधी येणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

पीएम किसान पोर्टलवर (PM Kisan Portal) ई-केवायसी (E-KYC) सुरू झाले आहे. पुढील हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवायचा असेल तर ३१ मार्चपर्यंत नक्कीच पूर्ण करा.

तसेच ११ व्या हप्त्याबद्दल सांगायचे झाले तर तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात (Account) जमा केला जाऊ शकतो.

हफ्त्याचा क्रम जाणून घ्या

एप्रिल-जुलैचा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान
ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान
डिसेंबर-मार्चचा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान

याप्रमाणे ई-केवायसी पूर्ण करा

सर्व प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
उजव्या बाजूला तुम्हाला सर्वात वर eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP टाका
जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल.

दरवर्षी तीन हप्ते मिळवा

आम्ही तुम्हाला सांगतो की पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, मोदी सरकार 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. आतापर्यंत सरकारने १०हप्ते जारी केले आहेत आणि १२ कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी ११व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe