SBI WhatsApp Banking: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अर्थात SBI ने व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा (WhatsApp Banking Services) सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या SBI ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर वापरकर्त्यांसाठी WhatsApp बँकिंग सेवेबद्दल माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचा (whatsapp) वापर मोठ्या लोकसंख्येद्वारे केला जातो. अशा परिस्थितीत, या प्लॅटफॉर्मवर बँकिंग सेवा मिळणे वापरकर्त्यांसाठी गोष्टी सुलभ करते.
विशेषत: व्हॉट्सअॅपवर बँकिंग सेवा मिळाल्याने वापरकर्त्यांना वेगळे अॅप (app) डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर बँक बॅलन्स (bank balance) तपासण्यासाठी तुम्हाला एटीएम किंवा बँकेत जाण्याचीही गरज भासणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर माहिती दिली आहे. यूजर्स व्हॉट्सअॅपवर मिनी स्टेटमेंट आणि बँक बॅलन्स यांसारखे तपशील मिळवू शकतात.
बँकेने माहिती दिली –
तुम्ही एसबीआय यूजर असाल आणि व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होतील. यूजर्स व्हॉट्सअॅपवर बँक बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंट तपासू शकतील. यासाठी त्यांना +91 9022690226 वर हाय मेसेज करावा लागेल. तुम्ही ही सेवा कशी वापरू शकता ते जाणून घेऊया.
नोंदणी करणे आवश्यक आहे –
सर्व प्रथम, वापरकर्त्यांना त्यांचे खाते SBI WhatsApp बँकिंग सेवांसाठी नोंदणीकृत करावे लागेल. नोंदणी करण्यासाठी, वापरकर्त्यांना +91 7208933148 वर ‘WAREG A/c No’ एसएमएस करावा लागेल. लक्षात ठेवा की, हा एसएमएस तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून करायचा आहे.
असे तपशील व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असतील –
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला +91 9022690226 वर हाय पाठवावे लागेल. यानंतर वापरकर्त्यांना ‘प्रिय ग्राहक, एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिंग सेवांमध्ये आपले स्वागत आहे!’ मेसेज येईल. येथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. वापरकर्त्यांना खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि डी-रजिस्टर असे तीन पर्याय मिळतील.
वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडावा लागेल. उदाहरणार्थ, वापरकर्त्यांना खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी 1 आणि मिनी स्टेटमेंटसाठी 2 टाइप करावे लागेल. वापरकर्त्यांनी उत्तर देताच त्यांना त्यांच्या खात्याचे तपशील व्हॉट्सअॅपवर मिळतील.
SBI वापरकर्त्यांना क्रेडिट कार्डसाठी WhatsApp आधारित सेवा मिळते. या सेवेच्या मदतीने, SBI क्रेडिट कार्ड (credit card) वापरकर्त्यांना त्यांच्या खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉइंट, थकबाकी, कार्ड पेमेंट आणि इतर पर्याय मिळतात.