Sitrang Cyclone News: विदेशातील हवामान खात्याने पूर्व भारतात ‘सुपर चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता वर्तवली होती. पण शनिवारी भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) हा अंदाज फेटाळून लावला. तसेच पूर्व भारतात कोणत्याही प्रकारच्या चक्रीवादळाचा धोका नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं.
तथापि, मंगळवारी सकाळी कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सौम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

आज सकाळपर्यंत हे वादळ उत्तर अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहितीही कोलकता येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिली.ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणारं वादळ हे ‘सीतरंग’ या नावानं ओळखलं जाणार आहे.
20 ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पण त्या वादळाचं मार्गक्रमण कसं राहिलं अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मात्र, येत्या 23 आणि 24 ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राला धोका किती? सध्या महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे.
ऐन दिवाळी बंगालच्या उपसागरात धडकणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही कमी-अधिक प्रमाणात धोका आहे. ‘सीतरंग’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी पूर्व महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती कोलकाता येथील IMD च्या RWFC ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात दिली आहे.