४ जानेवारी २०२५ : सोशल मीडियावर आता अर्ध्याहून अधिक जग दिवस रात्र काही ना काही करत असते. लाईक्स, कमेंट्स, पोस्ट असा खेळ सुरू असतो. या अभासी जगात अनेक अनोळखी लोक एकमेकांना भेटतात.पण सोशल मीडियावरील एक चूक महागात पडू शकते.
सुंदर मुलीच्या रिक्वेस्टवर अनेकांना आकाश ठेंगणे होते. पण कदाचित येथूनच Honey Trap सुरू होतो. हा सुंदर प्रवास पुढे मायाजालात अडकवतो. तिथे ब्लॅकमेलिंगला सुरुवात होते. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. तेव्हा सावज होण्याऐवजी सावध व्हा…
Cyber Dost ने केले अलर्ट
मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म वर सरकारचे अधिकृत खाते Cyber Dost ने एक पोस्ट करून युझर्सला अलर्ट केले आहे.सोशल मीडियावर हनी ट्रॅपपासून सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.त्यांनी समाज माध्यमावर कोणत्या चुका टाळाव्यात आणि कसे सतर्क राहावे याची माहिती दिली आहे. हनी ट्रॅपमध्ये कसे अडकविण्यात येते याची माहिती दिली आहे.
हनी ट्रॅप म्हणजे काय ?
हनी ट्रॅप एक मायाजाल आहे. याठिकाणी काही महिलांच्या मध्यस्थीने पुरुषांना फसविण्यात येते. महिला गोडीगुलाबीने पुरुषांना जाळ्यात ओढतात.त्यांचे व्हिडीओ, फोटो शेअर करून,गप्पांद्वारे सावज जाळ्यात ओढण्यात येते. त्यानंतर त्यांना फसविण्यात येते ब्लॅकमेलिंग करण्यात येते.समाजात,नातेवाईकांमध्ये बदनाम करण्याची धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते.
समाज माध्यमावर करू नका ही चूक
सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी मुलीच्या जाळ्यात अडकू नका.
अनोळखी तरुणीशी चॅटिंग करू नका. ही फसवणुकीची सुरुवात असते.
अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या माहितीचा पडताळा घ्या.
सोशल मीडियावर चॅटिंगदरम्यान तरुणी रोमॅटिक गप्पांमध्ये ओढत असेल तर सावध व्हा.
अशा खात्याची लागलीच तक्रार करा. प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांची मदत घ्या.
समाज माध्यमावर अनोळखी तरुणीची रिक्वेस्ट स्वीकारू नका अथवा तुम्ही पण पाठवू नका.
जर एखादी अनोळखी तरुणी सोशल मीडियावर व्हिडिओ कॉल करत असेल तर तो कॉल उचलू नका.
व्हिडीओ कॉलवर रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेलिंगचा प्रकार सध्या सुरू आहे.
सावध राहाल तर हनी ट्रॅप प्रकरणात अडकणार नाहीत. मोहात अडकून फसलात तर सायबर क्राईम नॅशनल क्रमांक 1930 वर कॉल करा.