अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने चाहत्यांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे.
लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या मालिकेची भुरळ पडली आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरल्या आहेत. त्यातल्या त्यात दयाबेन आणि जेठालाल.
या मालिकेत जेठालाल नेहमीच हटके कपड्यांमध्ये दिसून येतो. परंतु तुम्हाला माहितेय का हे कपडे कोण डिझाईन करतं? आज आपण याबद्दलच पाहणार आहोत.
मालिकेत जेठालाल दररोज अतरंगी शर्ट घातलेला दिसून येतो. हे शर्ट मुंबईतील जीतूभाई लखानी यांच्याकडून डिझाईन केले जातात. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की ‘जेठालाल चे शर्ट डिझाईन करण्यासाठी तब्बल 3 तास लागतात.
तर हा शर्ट शिवण्यासाठी 2 तास लागतात. अशाप्रकारे एकूण 5 तास या कपड्यांसाठी लागतात. गेली 14 वर्षे त्यांच्याकडूनच हे शर्ट डिझाईन केले जात आहेत.