या वर्षातील शेवटचा सुपरमून आज दिसणार

Published on -

Supermoon: आज देशभर रक्षाबंधनाची धूम सुरू असताना अवकाशातही एक महत्वपूर्ण घटना घडणार आहे. या वर्षातील शेवटचा सुपरमून आज ११ ऑगस्ट रोजी दिसणार आहे.

आधीच्या दोन सुपरमूनला स्ट्रॉबेरी मून आणि थंडर मून असे नाव देण्यात आले होते. यावेळी याला ‘फुल स्टर्जन मून’ असे नाव देण्यात आले आहे.

सलग चार सुपरमूनपैकी आजचा हा चौथा सुपरमून असेल. जेव्हा चंद्र पूर्ण भरलेला असतो त्याच वेळी चंद्राची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ असते अशा परिस्थितीला सुपरमून म्हणतात.

सुपरमून नेहमीच्या चंद्रापेक्षा १५ ते ३० टक्के जास्त उजळ दिसतो. हा सुपरमून बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस दिसण्याची शक्यता आहे.

एका वर्षात साधारणपणे तीन ते चार वेळा सुपरमून दिसतो. यावर्षी चार सुपरमून दिसणार आहेत. पौर्णिमा महिन्यातून एकदा येते. जेव्हा चंद्र अंतराळात सूर्याच्या विरुद्ध असतो आणि पृथ्वी त्या दोघांच्या मध्ये असते. त्यावेळी सुपरमून दिसतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News