पशुखाद्य दरवाढीने बिघडले दुधाचे गणित; दूध उत्पादक चिंताग्रस्त

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- नुकतेच दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातच महागाईचा अजून भडका उडाला असून आता पशुखाद्य निर्माते व विक्रेत्यांनी भरमसाठ दरवाढ केल्याने पुन्हा एकदा दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे.

दुधाची दरवाढ होताच १८०० रुपये असणारी ५० किलो सरकीपेंड २००० ते २२०० रुपये झाली आहे. भुसा ९५० रुपयांवरुन १५०० रुपयांवर गेला आहे. ११५० रुपयांना मिळणारे ५० किलो कांडी खाद्य १६५० रुपयांवर गेले आहे.

जनावरांना खाद्यामध्ये देण्यात येणारे मिनरल मिक्चर, कॅलशियमसह आजारपणात दिली जाणारी औषधे यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. मका, उसाचे वाढे, ऊस, गिन्नी सारख्या हिरव्या चाऱ्याचे दरदेखील वाढले आहेत.

कुठल्याही प्रकारच्या कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या नसताना देखिल पशुखाद्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. यावर शासनाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण दिसत नाही.

दुधाची दरवाढ झाली बरे झाली की, लगेच पशुखाद्याच्या किमती वाढतात. तर मग दरवाढ झाल्यानंतर वाढणाऱ्या किमती दर कमी झाल्यानंतर कमी झाल्या पाहिजेत तसे मात्र होताना दिसत नाही.

यामुळे दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe