पत्नी होती बॉयफ्रेंडच्या मिठीत आणि अचानक पती आला घरी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  पती एका विवाह सोहळ्यासाठी गेला असताना प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. मात्र, काही वेळानं पती घरी येताच मोठा गोंधळ उडाला. मध्य प्रदेशातील भिंड याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

विशेष बाब म्हणजे पतीने घरात प्रवेश करताच प्रियकराला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला बलात्काराच्या प्रकरणात फसवण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून 70 हजार रुपये वसूल केले.

तसेच प्रियकराचा माफी मागतानाचा व्हिडीओ या महिलेच्या पतीने तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबत अधिक माहिती अशी, पिपाहाडी येथील रहिवासी रवी गुर्जर याचे भिंड येथील सैनिक कॉलनीत राहणाऱ्या एका विवाहितेसोबत प्रेम संबंध होते.

पतीच्या गैरहजेरीत ते दोघे भेटत असत. दरम्यान एके दिवशी प्रेयसीचा पती विवाह सोहळ्यासाठी जातो सांगून घराबाहेर पडला. या संधीचा फायदा घेत महिलेनं रात्रीच्या वेळी प्रियकर रवीला घरी बोलावलं.

मात्र, महिलेचा पती अचानक रात्रीच घरी परतला. घरात प्रवेश करताच पत्नी प्रियकराच्या मिठीत असल्याचे पाहून पती संतापला. पतीने पत्नीच्या प्रियकरला मारहाण करत बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.

त्यानंतर विवाहितेच्या पतीने त्याच्याकडे पैशांची मागणी करत त्याच्याकडून 70 हजार रुपये घेतेले. प्रेयसीच्या घरी मारहाण झाल्यानंतर पीडित प्रियकराने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेली घटना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe