New Year Vastu Tips : जीवनात प्रगती करायची असेल तर आजही अनेकजण वास्तू शास्त्रावर विश्वास ठेऊन काही गोष्टी करतात आणि त्यामध्ये त्यांना सफलता देखील मिळते. पैसा, सुख, शांती या गोष्टी मिळाव्यात म्हणून अनेकजण वास्तू शास्त्रानुसार उपाय करत असतात.
स्वस्तिक चिन्ह

सनातन धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात स्वस्तिक हे चिन्ह अत्यंत शुभ मानले गेले आहे. पूजेपासून सर्व शुभ कार्यात स्वस्तिक चिन्हाचा वापर केला जातो.
नवीन वर्षाच्या आधी घराच्या मुख्य दरवाजावर चांदीचा स्वस्तिक गंगाजलाने पवित्र करून त्याची पूजा करा. रोज रोळी लावून त्याची पूजा करावी. तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास सदैव राहील.
फेंग शुई कासव
2023 च्या पहिल्या दिवशी किंवा त्यापूर्वी फेंगशुई कासव तुमच्या घरी आणा. फेंगशुई कासव सुख, समृद्धी आणि नशीब मिळवण्यासाठी खूप शुभ मानले गेले आहे. हे कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
तुपाचा दिवा
नवीन वर्षापासून परंपरा सुरू करा आणि दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा. असे केल्याने मां लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. या उपायाने धनाची देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो.
मिठाच्या पाण्याने घर पुसा
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाका. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता येते. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करा.
गणपतीची मूर्ती
नवीन वर्षात गणपतीची मूर्ती घरी आणा. घराच्या मुख्य दारावर गणेशाची 2 चित्रे किंवा मूर्ती अशा प्रकारे ठेवा की त्यांची पाठ एकमेकांशी जोडलेली असेल. असे केल्याने घरातील सर्व शारीरिक दोष संपून घरात सकारात्मकता, सुख-समृद्धी नांदते.