Trending News Today : भारतात मोदी सरकारकडून (Modi Goverment) गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आवास योजना आणत आहे. त्यातून नागरिकांना मोठा फायदा होत आहे. तसेच काही वेळा सरकारकडून सबसिडी ही दिली जाते. मात्र एका देशात चक्क घर (Home) घेतल्यावर सरकारच ५० लाख रुपये देत आहे.
घर घेण्यासाठी सरकार तुम्हाला ५० लाख रुपये देईल असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? असे कुठेही होत नाही असे म्हणता येईल. पण स्कॉटलंड सरकार (Scotland Goverment) अशीच एक योजना सुरू करणार आहे ज्यामध्ये लोकांना घर खरेदी करण्यासाठी सुमारे 50 लाख रुपये दिले जातील.

स्कॉटलंडच्या काही बेटांवर घर खरेदीची ही योजना सुरू करण्यात येणार आहे. स्कॉटिश सरकार तरुणांना आणि कुटुंबांना £50,000 (रु. 48 लाखांहून अधिक) देण्याच्या योजनेसह पुढे जात आहे. 2026 पर्यंत सुमारे 100 कुटुंबांना 48-48 लाख रुपये दिले जातील.
ज्या बेटांवर लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, त्या बेटांवरून लोकांची हद्दपारी थांबवण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. स्कॉटिश सरकारच्या मंत्र्यांना आशा आहे की हा उपक्रम 93 बेटवासियांसाठी नोकऱ्या आणि संधींच्या अभावाबद्दलच्या चिंतेचे निराकरण करेल.
‘डेली मेल’ अहवालानुसार, सरकारने म्हटले आहे की त्यांच्या योजनेमुळे लोकांना घरे खरेदी करणे, बांधणे किंवा नूतनीकरण करणे तसेच बेटावर शाश्वत जीवन जगण्यास मदत करण्यासाठी व्यवसाय सुरू करणे शक्य होईल.
या योजनेसाठी यापूर्वीच अर्ज आले आहेत.दूरच्या देशांतील लोकांनीही यासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमधील लोकांचा समावेश आहे.
घरांच्या किमतीत वाढ
आकडेवारीनुसार, वेस्टर्न बेट आणि ऑर्कने आयलंडमध्ये घरांच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली आहे, जी देशातील सर्वाधिक आहे. वेस्टर्न आयल्स कौन्सिलच्या ट्रान्सपोर्टेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष उस्दिन रॉबर्टसन म्हणतात की, येथे घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती सुमारे ९,६०० किमी दूर असलेल्या इक्वाडोरमधील एक कुटुंब होते.
परंतु समीक्षकांनी म्हटले आहे की ही योजना स्कॉटिश सरकारची “चाल” आहे, ज्याने बेटाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासारख्या दीर्घकालीन प्रकल्पांवर पैसे खर्च केले पाहिजेत. लोकसंख्या हा बेट समुदायांसाठी सर्वात मोठा धोका आहे.